स्व. अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त 200 नारळ रोपांचे वाटप

दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी च्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत आयोजन

स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी जनसेवा सप्ताह निमित्त प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या संकल्पनेतून दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कळणे येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत दोडामार्ग राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मेघेंन देसाई, तालुका उपाध्यक्ष दीपक देसाई यांनी 200 नारळाच्या रोपांचे वाटप हा कार्यक्रम आयोजित केला होता.
स्वर्गीय अजित दादा पवार यांना दोन मिनीट स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करून जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते 200 नारळाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी संबोधित करताना असे सांगितले की स्वर्गीय अजित दादा यांचे काम फार मोठे होते ‘ कामाचा माणूस ‘ अशी त्यांची ख्याती होती या नारळाच्या झाडांच्या लागवडी मुळे अजित दादांची आठवण कायम राहील.
कार्यक्रमावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंन देसाई,उपाध्यक्ष राष्ट्रवादी दोडामार्ग दीपक देसाई,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, कळणे सरपंच अजित देसाई, तुकाराम बर्डे, विश्वासराव देसाई, संदेश देसाई, श्रीराम देसाई, सर्वेश् देसाई, परशुराम नाईक, सदानंद नाईक, भरत खरवत,जयराम देसाई मोहन देसाई भरत वाघाटे,रघुवीर वाघाटे,विश्वास यादव, अजित शिंदे, प्रशांत नाईक, शाहीर खान, अनंत ताटे,पुरुषोत्तम देसाई,आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!