ऍड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांचा कणकवली माजी नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार

एलएलएम पदवीच्या शिक्षणासाठी जाणार लंडन येथे
कणकवलीतील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. राजेंद्र रावराणे यांचा मुलगा पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी इंजीनियरिंग ची पदवी प्राप्त केल्यानंतर कायद्याचे एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली व या पुढील एलएलएम या शिक्षणाकरिता ते लंडन येथे जाणार आहे. याबद्दल कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. एल एल एम पदवीच्या दोन वर्षाच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला जाणार आहेत. व त्यानंतर भारतात परतल्या ते उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसायाची प्रॅक्टिस करणार आहेत. त्यांच्या या सत्कार प्रसंगी राजश्री रावराणे, कणकवलीच्या माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, माजी नगरसेवक अभय राणे, बंडू गांगण आदि उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली