हिंदू ऐक्य प्रगतीशील भारतासाठी आवश्यक

सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

गुळुदुवे येथे पूज्य सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी पुण्यतिथी महोत्सव संपन्न

सावंतवाडी

   आपण सर्वांनी साधु संताच्या विचारांची आणि कार्याची उजळणी करण्याची आवश्यकता आहे.साधुसंतांचे  व आध्यात्मिक विचार जर गांभीर्याने घेतले जात नाहीत त्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जात आहे. पूज्य सद्गुरू सदानंदाचार्य स्वामीजींनी समाजाला श्रेष्ठ अश्या अध्यात्म ज्ञानाची शिकवण दिली, सत्यश्रेष्ठ ईश्वरी ज्ञान घरोघरी जावून पोहोचविले. आपल्यामध्ये जो सच्चिदानंद म्हणजे चैतन्य आहे त्याच्याशी आपल्याला जोडून दिले. प्रत्येकामध्ये आपल्याला ईश्वर पाहण्याची शिकवण दिली. आपण सर्वांनी जातींमधील भेद विसरून हे संपूर्ण विश्व आपले कुटुंब आहे असे समजून बंधुत्वाचे नाते ठेवून वागले पाहिजे यासाठी संतांचा उदार विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. आपल्यामध्ये असलेल्या ईश्वराशी सांगड घालून दिल्यामुळेच साधुसंताचे श्रेष्ठत्व आहे असे पद्मश्री धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आपल्या आशिर्वचनातू उद्बोधन केले.
   श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्‍वरी ज्ञानोपदेशक सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजींचा पुण्यतिथी महोत्सव परंधाम गुळदुवे मठ सावंतवाडी- महाराष्ट्र काल रविवार दि. ०३ सप्टेंबर २०२३ रोजी, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात संपन्न झाली. श्री राजन तेली माजी आमदार, सौ अर्चना घारे राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका अध्यक्षा, श्री बाळा परब श्री माऊली देवस्थान अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आरोस, श्री परशुराम उपरकर माजी आमदार ,श्री हेमंत मराठे उपसरपंच मळेवाड,श्री प्रमोद नाईक उद्योजक शिरोडाअन्य मान्यवर यांनी  उपस्थिती  लाभली.परंधाम गुळदुवे मठात सकाळच्या सत्रात पूज्य सद्गुरु समाधी स्थानी महापूजा, पूज्य सद्गुरू चरित्र वाचन,सद्गुरु भक्तिमहायज्ञ, काशिविश्वेश्वर स्थानी रुद्राभिषेक व गुळदुवे पंचक्रोशीतील भजनी पथकाद्वारे पारंपारिक पार संपन्न झाले.  प्रकट कार्यक्रमात पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे दिव्य आशीर्वचन संपन्न झाले. सायंकाळी ठिक ४.०० वा. भजन, पालखी उत्सव व पूज्य सद्गुरु आशीर्वचन संपन्न झाले.

कार्यक्रमाला गुरुमाता अ‍ॅड्. ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठ – संचालक मंडळ, कृपाकांक्षी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिष्यगण तमाम हिंदू धर्मीय भाविकांनी सहभाग घेतला. आरती व पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!