तोंडवळी फुगडी स्पर्धेत सखी गृप पावशी प्रथमआचरा–अर्जुन बापर्डेकरश्री देव वाघेश्वर भक्त मंडळ तोंडवळीतर्फे आयोजित फुगडी स्पर्धेत सखी ग्रुप पावशी कुडाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय सखी ग्रुप खारेपाटण यांनी तरतृतीय क्रमांक तारादेवी महीला ग्रुप केळूस वेंगुर्ला यांनी पटकावला. तिसरया श्रावण सोमवार निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या फुगडी स्पर्धेचे उदघाटन रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते झाले .यावेळी त्यांच्या सोबत मंडळाचे मिलिंद पाटील,महेश चव्हाण,महेश पेडणेकर,मिलिंद पाटील,वासूदेव तोंडवळकर,प्रमोद पाटीलमालोजी हडकरआदित्य पेडणेकर(राजा)सुभाष पाटील,सुवर्णा पाटील,पांडुरंग कोचरेकर, स्पर्धेचे परीक्षकसंजय केळूसकर,प्राची राणे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत उत्तेजनार्थपावणादेवी संघ किंजवडे देवगडभिमगर्जना फुगडी संघ पाट कुडाळ आणि गवळदेव फुगडी ग्रुप बोर्डवे सुंदरवाडी कणकवली यांना गौरविण्यात आले.स्पर्धेचे सुत्र संचलन राजा सामंत यांनी केले.स्पर्धे पुर्वी मंडळातर्फे महिलांना हळदकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ बहुसंख्य महिलांनी घेतला.
फोटो–प्रथम क्रमांक विजेत्या फुगडी संघाला गौरविताना मंडळाचे पदाधिकारी, परीक्षक