ज्यानी कसं जगावं याचे धडे दिले आणि एक चांगली व्यक्ती घडविली अशा शिक्षकांचे स्मरण करणे त्याचे आभार मानन्याचा दिवस म्हणजे “शिक्षक दिन”.

रोटरी क्लब मार्फत शिक्षक केशव बाबी जाधव या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा करण्यात आला सत्कार

सावंतवाडी

रोटरी क्लब, सावंतवाडीच्या सदस्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही एका प्रातिनिधीक स्वरुपात शासकीय पारितोषिक प्राप्त आणि आपल्या शिक्षकी पेशाला शोभेल असे कार्य करुन शिक्षक, विद्यार्थी आणि समाजात आपल्या कार्यानी नावाजलेल्या ISO मानांकित जिल्हा परिषद पुर्ण प्रार्थमिक शाळा नं.2 माडखोल येथील शिक्षक केशव बाबी जाधव या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा यथोचित सत्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.सुहास सातोसकर यांंच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी इतर शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ISO कमिटी अध्यक्ष प्रकाश मुरकर, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उदय राऊत, सौ.समिक्षा पानोळकर, सौ.कविता कोळमेकर मुख्याद्यापक सौ.भावना गावडे, शिक्षक अरविंद सरनोबत, श्रीम. वैदेही सावंत, सौ.समिक्षा राऊळ आणि जेष्ठ रोटेरीयन अनंत उचगावकर, रो.दिलीप म्हापसेकर, रो. प्रदिप शेवडे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन इव्हेट-चेअरमन रो.सत्यजित धारणकर यानी केले.

error: Content is protected !!