श्रमदानातून हिर्लेवाडी रस्त्याची केलीकेली डागडुजी

रामेश्वर विकास सेवा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर यांचा स्तुत्य उपक्रम
आचरा–अर्जुन बापर्डेकर
आचरा हिर्लेवाडी रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली होती.या बाबत पुढाकार घेत रामेश्वर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अवधूत हळदणकर यांनी श्रमदानातून खडी आणि मातीने खड्डे बुजवत रस्ता वाहतूक योग्य बनविला.यात त्यांना आश्विन हळदणकर, समिर बावकर, लवू मालंडकर,प्रथमेश कोळंबकर, दिनेश पाटील, विनायक कोळंबकर, साहिल पेडणेकर ,पुरुषोत्तम पेडणेकर, विलास मुणगेकर , शेखर मुणगेकर, प्रसाद पेडणेकर, अक्षय शिर्सेकर, सदानंद पाटील , बंटी तांडेल, अमित मुणगेकर, अनंत तांडेल, विशाल पाटकर, नंदू तांडेल, सुशील आचरेकर, अक्षय पेडणेकर, प्रणव पेडणेकर , स्वप्नील पेडणेकर, जय पेडणेकर , कुणाल पेडणेकर, संकेत तोंडवळकर, प्रकाश वाईंगनकर, गणपत पेडणेकर,सुहास मुणगेकर,अक्षय मालडकर, मनोज वराडकर, गौरव वझे, विनोद मुणगेकर आदींचे सहकार्य लाभले.