पियाळीत ऊस शेतीला आग लागून लाखोंचे नुकसान
काजू बागा देखील आगीच्या भक्षस्थानी
कणकवली : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे आज सोमवारी भर दुपारी ऊस शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस शेती बरोबरच इतर ही काजू कलम बागाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी आग लागल्याने व वारा ही सुटल्याने आग अजून ही सर्व माळ राना पर्यंत भडका उडाला. दरवर्षी येथे आग लागून ऊस बागायती शेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या वर्षी ही आग लागल्याने नुकसान झाले होते.वेळोवेळी पंचनामे केले परंतु अद्याप ही कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने यावेळी नुकसानाची नोंदणी करावी वाटत नसल्याचे ऊस बागायती शेतकरी रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांनी सांगितले आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली