आंगणेवाडी यात्रेतून कुडाळ आगाराला ५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न
आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती
कुडाळ : श्री भराडी देवी आंगणेवाडी यात्रा ४ फेब्रुवारी रोजी पार पडली. सदर यात्रेकरिता जादा वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या कुडाळ आगारातून नियोजन करण्यात आले होते. कुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावातून २७ गाडया आंगणेवाडीसाठी धावल्या. जादा वाहतूकीच्या माध्यमातून कुडाळ आगाराकडून ८ हजार १६ किमी चालवून त्यातून ५ लाख ६८ हजार ५७९ रुपये उत्पन्नातून ७०.३० प्रती किमी उत्पन्न आणि ११६:१२ एवढे भारमान मिळाले. आंगणेवाडीमध्ये विशेष बससेवेसाठी ४ बसेस त्यातून उत्पादीत किमी ५१४ व अनुत्पादीत किमी ६८६ चालविण्यात आले. यामधून रुपये ६६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. प्रती किमी ५५ उत्पन्न व ९९.०४ एवढे भारमान मिळाले. भाविकांसाठी एकूण २३ एसटी बसचा वापर करून ११० बसफे-या सोडण्यात आल्या. यामधून ५ लाख २५७९/- एवढे उत्पन्न कुडाळ आगारास प्राप्त झाले. तर प्रती किमी ७३.७ एवढे उत्पन्न व १२०.७१ भारमान मिळाले. यासाठी एकूण २७ चालक व २३ वाहक असे एकूण ५० कर्मचारी यांचा वापर करण्यात आला. सदर यात्रा विभाग नियंत्रक प्रशांत सुभाष वासकर व विभागीय वाहतुक अधिकारी. विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. तसेच ही यात्रा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात्रा कालावधीत कोणतेही एसटी बस बिघाड झाली नाही. त्यामुळे यांत्रिक कर्मचारी यांच विशेष अभिनंदन करण्यात आले. यात्रा प्रमुख म्हणून सावंतवाडी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी काम पाहिले. तसेच जादा वाहतुकीचा लाभ प्रवाशी भाविकांनी घतल्या बददल आगार व्यवस्थापक सचेतन जयराम बोवलेकर यांनी प्रवाशांचे विशेष आभार मानले आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ