कणकवली बांधकरवाडी जवळ लागलेल्या आगीत भंगार साहित्य व माड जळाले

कँझ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे यांची सतर्कता

नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंबाद्वारे आग आणली आटोक्यात

कणकवली शहरात बांधकरवाडी दत्तमंदिर रोड जवळ आज सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तेथील एका भंगार व्यवसायिकांने लावलेली आग नजीकच्या गवताला लागून आग भडकल्याने या आगीत तेथील भंगाराचे काही साहित्य व तेथे असलेले माड आगीच्या भक्षस्थानी पडले. दरम्यान आगीने उग्ररूप धारण केलेले असतानाच, याबाबत माहिती मिळतात कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे यांनी याबाबत तात्काळ नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती देत अग्निशमन बंब पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंब घटनास्थळी नेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या आग लागलेल्या भागाच्या आसपास वस्ती असल्याने होणारे संभाव्य नुकसान देखील टळले. यावेळी नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह संदीप नलावडे, नवराज झेमने आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!