भाबगिरी डोंगरावर १२०० देशी झाडांची लागवड 

मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत लागवड 

एसआरएम कॉलेज आणि संविता आश्रम यांचा संयुक्त उपक्रम 

प्रतिनिधी । कुडाळ : केंद्र सरकारच्या “मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात अणाव इथल्या भाबागिरी डोंगरावर बाराशे देशी झाडांची लागवड करण्यात आली. कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, निसर्ग मंडळ, पणदूरचा संविता आश्रम तसच माय वे जर्नी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमान हा उपक्रम राबवण्यात आला.  यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे १६० तर निसर्ग मंडळ आणि  माय वे जर्नी ऑर्गनायझेशनचे ४० स्वयंसेवक विद्यार्थी हे सहभागी झाले होते.
जांभूळ, आंबा, फणस, चिंच, उंबर, वड, पिंपळ, हिरडा, अर्जुन, आईन, करंज, विलायती चिंच अशा प्रामुख्यान भारतीय वातावरणात रुजतील आणि  जंगली वन्यजीवांना उपयुक्त ठरतील अशी फळझाड तसच देशी वृक्ष लावण्यात आले.  जंगलातल्या  वानरांचा गावातली  भातशेती आणि  फळशेती यांस होत असलेला उपद्रव पाहून गेल्या वर्षापासून जंगलामध्ये फळझाड लावण्याचा निर्णय हा संविता आश्रम आणि  संत राऊळ महाराज महाविद्यालयान घेतला आहे. गेल्या वर्षापासून या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. गतवर्षी ही भाबगिरी  डोंगर येथे ६०० आंब्यांची रोप लावण्यात आली होती.  
या उपक्रमासाठी संविता आश्रम आणावचे  संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांच विशेष सहकार्य लाभल. संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.बी.झोडगे यांनी या कार्यक्रमात  जास्तीत जास्त संख्येन सहभागी व्हावे यासाठी विद्यार्थांना प्रोत्साहीत केल. कार्यक्रमाला  आश्रम कर्मचारी आशिष कांबळी, महाबळेश्वर कामत, नरेश आंगणे, विशाल परब, संजय कदम, भक्ती परब, आरती वायंगणकर, माधवी दळवी, निशा चव्हाण, ज्योती आंगणे, मेलवीन डिसोझा, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश कामत, प्रा. भावेश चव्हाण, प्रा. सबा शहा, निसर्ग मंडळ तसच माय वे जर्नी ऑर्गनायझेशनचे डॉ. योगेश कोळी हे उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!