वारगाव जि.प.शाळा नं.३ च्या वतीने एक दिवस बळीराजासाठी उपक्रम संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारगाव नं. 3 या शाळेच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम मा. उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नाना शेट्ये यांच्या शेतामध्ये साजरा करण्यात आला .त्यांनी मुलांना शेती विषयी मार्गदर्शन केले व शेतीचे महत्त्व समजावून सांगितले. या वेळी वारगाव गावच्या प्रथम नागरिक मा. सौ. नम्रता शेट्ये मॅडम या हि उपस्थित होत्या त्यांनी हि विद्यार्थ्यांना शेतीचे महत्व सांगितले या सर्व उपक्रमाला केंद्रप्रमुख माननीय श्री. गोपाळ जाधव साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. कल्पना सावंत , सत्यवान केसरकर सर, सौ.अर्चना तळगावकर मॅडम, वंशिका महाडेश्वर व रविंद्र जयराम लोकरे सर उपस्थित होते .
अस्मिता गिडाळे, खारेपाटण