खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ येथे “सिंधुरत्न टॅलेंट सर्च “परीक्षा संपन्न

एकूण ११७ विद्यार्थी घेतला परीक्षेत समभाग
युवा संदेश प्रतिष्ठान ता. कणकवली जि.सिंधुदुर्ग आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात STS ही स्पर्धा परीक्षा आज रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध केंद्रावर होत असून कणकवली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेतील परीक्षा केंद्रावर सुरळीत संपन्न झाली.
या परिक्षेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे निरीक्षक श्री. प्रतीक मुनेश्वर, परीक्षा केंद्र प्रमुख व खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. प्रदीप श्रावणकर, सौ. श्रीतिजा धुमाळे, नडगिवे नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनिता पाटकर, चिंचवली जि. प.शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोरक्षनाथ गायकवाड, टाकेवाडी संभाजीनगर जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम सुप्रिया झगडे, शेर्पे जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वांशिका महाडेश्वर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार श्री. संतोष पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षक विषयी मार्गदर्शन करून विद्यार्थांना STS परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. तर खारेपाटण जि. प्. केंद्र शाळा नं. १ परीक्षा केंद्रावर देवगड तालुक्यातील धालावली व कुणकवण तसेच कणकवली तालुक्यातील खारेपाटण,शेर्पे, चिंचवली, नडगीवे, कुरंगावणे, वायंगणी आदी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ री ते ७ वी च्या सुमारे ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. प्रदीप श्रावणकर यांनी केले.





