कणकवली चे माजी उपसभापती बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणेंनी केले स्वागत
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुक असलेले बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हळदिवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा घाट जिल्हा परिषद मतदार संघाची उमेदवारी शिंदे शिवसेनेकडे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महेश कांदळकर, शरद वायंगणकर सत्यवान राणे आदी उपस्थित होते.





