कणकवली तालुक्यातून भाजपमध्ये पहिली बंडखोरी संतोष कानडे यांची

फोंडाघाट मतदारसंघातून लढवणार निवडणूक
कासार्डे मतदार संघासाठी होते इच्छुक
नितेश राणे यांना स्टेटस ठेवत केला होता रामराम
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले परंतु एबी फॉर्म न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व वृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वतः अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेटस वर पोस्ट करत जाहीर केले आहे की फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारी दाखल करत असून मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद देण्यासाठी तहसीलदार कार्यालय कणकवली येथे आज 21 जानेवारी रोजी उपस्थित राहावे. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. भाजपाचे माजी उपसभापती बबन हळदिवे यांनी आज भाजपातून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. एकीकडे शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर लागलीच हळदीवे याना शिवसेनेचा एबी फॉर्म देऊन हळदीवे यांची फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपाकडून कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या संतोष कानडे यांनी थेट बंडखोरी करत फोंडाघाट मधून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.





