निराधार बांधवांसाठी काम करणाऱ्या जीवन आनंद संस्थेचा १२ वा वर्धापन दिन मुंबई येथे संपन्न

“शालेय विद्यार्थी आणि युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि सकारात्मक उद्योग करावा” – डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

“आजची युवा पिढी, शालेय विद्यार्थी आणि युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि सकारात्मक उपयोग करावा. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी रस्त्यावरील निराधारसाठी काम करणाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या १२ व्या वर्धापन दीन कार्यक्रमात व मुंबई विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाच्या एन एस एस कॅम्प च्या संयुक्तिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
जीवन आनंद संस्थेला दि. १८ जानेवारी २०२६ रोजी १३ वर्षे पूर्ण होत असून संस्थेचा १२ वा वर्धापन दिन कार्यक्रम नुकताच सविता आश्रम पणदूर येथे संपन्न झाला. यावेळी विद्याविहार,मुंबई येथील सोमैया महाविद्यालयच्या एनएसएस कॅम्प चे उद्घाटन देखील एकाचवेळी डॉ. मोहन दहिकर यांचेसह राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक – रत्नागिरी डॉ. राहुल मराठे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी संस्थेच्या स्थापनेपासून निराधार व वंचितांसाठी सुरू असलेल्या कार्याला पोलिस प्रशासनाची नेहमीच मोलाची साथ लाभल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या रूपाने प्रथमच एका वरिष्ठ पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्याने संविता आश्रमाला भेट दिल्याचे त्यांनी आवर्जून या कार्यक्रमात नमूद केले.
डॉ. राहुल मराठे यांनी सोमय्या महाविद्यालयाच्या NSS निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वयंसेवक होण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने समाजसेवा करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. राहुल मराठे यांचेसह जीवन आनंद संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते आशिष कांबळी, विजया कांबळी, देऊ सावंत, लीना पालकर, प्रियांजली कदम, गोपाळ पालव, संतोष देऊलकर, महेश्वरी अणावकर, तुळसा जाधव, नरेश आंगणे, ज्योती आंगणे यांना सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, महाबळेश्वर कामत ,शैलेंद्र कदम यांना वृक्षाचे रोप आणि शाल श्रीफळ प्रदान करून त्यांना देखील संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक श्री. मोहन दहिकर यांनी आश्रमाला भेट देत येथील निराधार बांधवांची आपुलकीने चौकशी केली. व त्यांना दिलसा देत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त जितेंद्र परब, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!