भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस ‘ माटणे ‘ तून लढणार

भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
भाजप, ठाकरे सेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार
अपक्षही नशीब अजमावण्याची शक्यता
अखेर माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून नवा चेहरा देण्याचे निश्चित झाले आहे.भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेणारे,पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचाराचे तरुण ,तडफदार उमेदवार आणि भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस हे आता माटणेच्या निवडणूक रिंगणात दिसणार आहेत.शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविकिरण गवस या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.तालुक्यात ३ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.जिल्हा परिषदेचे माटणे वगळता मणेरी व साटेली भेडशी मतदारसंघ अनुक्रमे ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.एकमेव माटणे मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने सर्वजण या मतदारसंघाकडे आकर्षित होतील हे सहज होते.दोनवेळा येथून निवडून आलेले भाजपचे राजेंद्र म्हापसेकर या जागेसाठी आग्रही होते.मात्र, या मतदारसंघातून भाजपने दीपक गवस यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.गवस यांची नाळ आरएसएस आणि भाजयुमोशी जोडली गेली होती,त्यानंतर त्यांना भाजप तालुकाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. या काळात त्यांनी गोमांस वाहतूक प्रकरणी केलेले आंदोलन जिल्हाभर गाजले होते.साहजिकच भाजपचे निष्ठावान म्हणून त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे.





