Views: 33
कणकवली महाविद्यालयाची तृतीय वर्ष वाणिज्य वर्गात शिकणारी कु. सुजाता हर्णे हिची मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या बॉल बॅडमिंटन या खेळाच्या संघात सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. 2 जानेवारी, 2026 रोजी मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात झालेल्या विद्यापीठाच्या चार झोनच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कोकण झोन (04) चे प्रतिनिधीत्व केले होते. तिची या खेळातील गुणवत्ता पाहून मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे.
सुजाता हीला बॉल बॅडमिंटन खेळात विशेष आवड आहे. लहानपणापासून तिने ही आपली आवड जपली आहे.
सुजाता हर्णे तामिळनाडू येथे 11 ते 15 फेब्रुवारी, 2026 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या बॉल बॅडमिंटन खेळाच्या च्या संघात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सुजाता हर्णे ही राष्ट्रीय छात्र सेनेची उत्कृष्ट कॅडेट आहे.
सुजाताच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे सर्व पदाधिकारी व प्र. प्राचार्य युवराज महालिंगे व कणकवली महाविद्यालयाच्या कर्मचारी वृंदाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. सुजाताच्या या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.