500 झाडे लावून ती जगवण्याचा अनोखा निर्धार!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा स्तुत्य उपक्रम
पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी घेतला निर्णय
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अंतर्गत विविध ठिकाणी 500 झाडे लावून जगविण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी घेतला आहे. आता पर्यंत जवळपास 150 झाडे आचारा ,हळवलं, फोंडाघाट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये लावली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व वृक्ष लागवडी बरोबरच केलेली वृक्ष लागवड जगवावी व यातून पर्यावरणाला बळकटी मिळावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री. सर्वगोडयांनी दिली. अजयकुमार सर्वगोड यांच्यासोबत उप अभियंता के के प्रभू, अभियंता विनायक जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली