धक्कादायक ! रोहित स्पोर्ट्सच्या रोहित बोलवेकर यांचे निधन 

प्रतिनिधी । वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात मठ येथील रहिवासी तथा रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक रोहित बोवलेकर यांचे आज सायंकाळी गोवा इथं व्हिजन रुग्णालयात निधन झाल. त्यांच्या अचानक जाण्यामुळे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट प्रेमींना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे. बोलवेकर कयशुचे मालक सुरेश बोवलेकर यांचे रोहित हे पुत्र होत.
 अवघ्या पस्तिशीच्या रोहित  याना क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्यांनी  तयार केलेला रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लब हा संघ जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध आहे. अनेक मोठया मोठ्या स्पर्धा या संघानं जिंकल्या आहेत.  लाखोंची बक्षीस आणि करंडक पटकावले आहेत. गेल्या काही वर्षात रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लब संघानं रोहित बोवलेकर यांच्या नेतृत्वाखाली नावलौकिक मिळवला. रोहित बोलवेकर यांच्या जाण्यानं अवघ्या टेनिस क्रिकेट विश्वाला हादरा बसला आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वेंगुर्ले 

error: Content is protected !!