आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये जिल्हा स्तरीय “श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन.
कणकवली/मयुर ठाकूर.
आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे व डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या* संयुक्त विद्यमाने , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा या उद्देशाने व दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय ” श्रावणधारा”सुगम संगीत स्पर्धा 2023″* चे आयोजन केले आहे,
स्पर्धा इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी व इयत्ता ९वी ते १२ वी व खुला गट अशा तीन गटात असेल,तिन्ही गटांना भावगीत ,भक्तीगीत,नाट्यगीत, गज़ल यापैकी एक ५ मिनिटे गाणे सादर करायचे आहे,
बक्षिसे..
इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी गट
प्रथम – रु.1500/- व आकर्षक चषक
द्वितीय – रु.1000/- आकर्षक चषक
तृतीय – रु.800/- आकर्षक चषक
उत्तेजनार्थ – प्रमाणपत्र
इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी गट
प्रथम – रु.2000/- व आकर्षक चषक
द्वितीय- रु.1500/- व आकर्षक चषक
तृतीय – रु.1000/- आकर्षक चषक
उत्तेजनार्थ- प्रमाणपत्र
खुला गट
प्रथम – रु.2500/- व आकर्षक चषक
द्वितीय – रु.2000/- व आकर्षक चषक
तृतीय- रु.1500/- व आकर्षक चषक
उत्तेजनार्थ- प्रमाणपत्र
स्पर्धेचे नियम
१) सदर स्पर्धा ही एकल गायन स्पर्धा आहे.
२) गाणे सादर करण्याची वेळ ५ मिनिटे असेल.( 4 मिनिटांनी सूचना केली जाईल.)
३) सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे 16/8/23 पर्यंत पोहचतील अशी पाठवावी
४)वादक व वाध्ये उपलब्ध होतील.
५)प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
६) स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
७) अंतिम फेरीदिवशी स्पर्धकांची माध्यन्ह भोजनाची व्यवस्था केली जाईल.
८)परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.
नाव नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक
9527995001
9890520888
8380053641
9890267138
प्रथम फेरी – रविवार दिनांक 20/08/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 . प्रथम फेरी मध्ये पसंतीच्या एका गाण्याचा एक अंतरा सादर करावा
अंतिम फेरी – शनिवार दिनांक 02/09/2023.
स्थळ .आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे.
मु.पो.वरवडे,विद्यानगर ,ता.कणकवली** जि. सिंधुदुर्ग .