सरंबळ देऊळवाडी भूस्खलन बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणार

रणजित देसाई यांनी केली धोक्याच्या ठिकाणची पाहणी

पालकमंत्री आणि निलेश राणे यांचे लक्ष वेधणार

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील देऊळवाडी मधील डोंगराचे गेली अनेक वर्ष भूस्खलन होत आहे. याबाबत उद्या पालकमंत्री व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती रणजीत देसाई यांनी दिली. देसाई यांनी आज या ठिकाणची पाहणी केली.
कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील देऊळवाडी मधील डोंगराचे गेली अनेक वर्ष भूस्खलन होत आहे. यावर्षी देखील पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या डोंगरातील माती रस्त्यावर आली असून डोंगराला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. या डोंगराला लागूनच मुख्य रस्ता व त्याच्याखाली सुमारे २५ ते ३० घरे आहेत. भविष्यात हा डोंगर खचल्यामुळे किंवा झाडे पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. सरंबळ गावातील बहुतांशी वाड्या ह्या डोंगराच्या अलीकडे असून याच डोंगराच्या पलीकडे गावचे मुख्य देऊळ, ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सोसायटी व प्रमुख आस्थापना आहेत.


डोंगर खचल्यामुळे या सर्वांचा संपर्क तुटण्याचा संभव आहे. हा धोका लक्षात घेऊन सरपंच रावजी कदम यांच्या विनंतीनुसार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व पंचायत समिती माजी सदस्य संदेश नाईक यांनी सरंबळ मधील या धोक्याच्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली. याबाबत उद्या पालकमंत्री व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती रणजीत देसाई यांनी दिली.
यावेळी सरपंच रावजी कदम, ग्रामपंचायत उपसरपंच सागर परब, महेश सरमळकर, बंटी गोसावी, सुनील हादगे, अमोल कदम, श्रावण जाधव, अरूण कदम, संदिप जाधव गौरेश गोसावी पोलीस पाटील वराडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!