मनसेकडून कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान

प्रतिनिधी । कुडाळ : चार भिंतीत बसून नुसते आदेश न देता मुसळधार पावसात आणि आपत्कालीन परिस्थितीत फिल्डवर उतरून रात्रभर जगता पहारा देणारे कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांचा आज कुडाळ तालुका मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
मागील आठवडाभर पावसान कहर करत संपूर्ण कुडाळ तालुक्याला झोडपून काढल आहे. त्यामुळे कुडाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण होऊन प्रशासनाकडून आपत्ती प्रतिबंधात्मक उपाय योजना युद्ध पातळीवर करण्यात आल्या. पुरसदृश्य भागातील जागरूक नागरिकांच्या सहयोगातून प्रशासन अलर्ट आणि  ॲक्शन मोडवर होते.या परिस्थितीत कुडाळ तहसीलदार अमोल पाठक कार्यालयाच्या चार भिंतीत बसून आदेश न देता न तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून रात्रभर ऑन फिल्ड जागता पहारा देत संपूर्ण तालुक्यात फिरून आढावा घेत होते. एकूणच नैसर्गिक आपत्ती परिस्थिती कुडाळ तहसीलदार आणि  सर्व प्रशासकीय यंत्रणेन नागरिकांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीन हाताळल्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी, दिपक गावडे, गुरू मर्गज, वैभव धुरी,इम्रान शेख आदी पदाधिकाऱ्यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान करत त्यांच्या कामाच कौतुक केल आहे. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!