वागदे मध्ये आर्यादुर्गा मंदिरात दानपेटी फोडली
कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल
दानपेटीतील रोख रक्कम लंपास
कणकवली शहरा नजीक असलेल्या वागदे आर्यदुर्गा येथील मंदिरातील दानपेटी चोरट्याने सोमवारी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या दानपेटीमध्ये सुमारे 25 ते 30 हजार रुपये असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक शरद देठे, मनोज गुरव हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर तातडीने श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले. या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वागदे सरपंच संदीप सावंत यांनी देखील घटनास्थळी भेट देत त्या माहिती घेतली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली