अतुल बंगे, अभ्यास करा आणि मग बोला.. बेताल वक्तव्य करू नका !

शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांचा इशारा
प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली जिल्हा परिषद मतदार संघात विकासाची वल्गना करणाऱ्या व स्वतःला शिवसेना नेते म्हणून मिरविणाऱ्या अतुल बंगे यांनी आधी मी किती विकासाची कामे केली याचा अभ्यास करावा व नंतरच बेताल वक्तव्ये करावीत असा इशारा शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.
श्रीमती कुडाळकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, मी तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात गेली बरीच वर्षे कार्यरत आहे. या मतदार संघाबरोबरच तेंडोली गावचा विकास येथील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे. विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. डोगरी विकास निधी 2 वेळचे 70 लाख रुपये निधि मी माझ्या. मतदारसंघात खर्च केलेला आहे. त्याशिवाय स्वनिधी, १५ व्या वित्ता आयोगाचा २ वेळचा निधी मी माझ्या मतदारसंघातच टाकलेला आहे. शिवाय मा.आमदार, मा. खासदार यांचा भरघोस निधी मतदार संघात आहेच आणि जिल्हा परिषद सदस्य या नात्याने मी वेळोवेळी त्याचा पाठ पुरावा केलेला आहे.
हुडकुंभावाडी साकव कोसळत असताना स्वतःचे पैसे खर्च करून तात्पुरती डागडुजी करून लगेच निधीही मजूर केलेला आहे. बंगे साहेब तुम्हाला माहित नसेल तर सांगते, मी जिल्हा परिषदेची 5 वर्ष संपल्यानंतरच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला कारण तुम्हाला मुक्तपणे काम करायला मिळावं. माझ्यावर आरोप करण्यातच तुमचा वेळ फुकट जाईल. येथील सामाजिक शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे येथील ग्रामस्थ विसरू शकत नाही स्वयघोषित नेते समजणाऱ्या अतुल बंगे यांनी सातशे रुपयाचे ताडपत्री देऊन प्रश्न मार्गी लागणार नाही. आम्ही केलेली विकासकामे ही ग्रामस्थांच्या नजरेत आहेत याचे भानही बंगे यांनी ठेवावे असे सूचित केले.
आज राज्यात आमची शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. विकासासाठी मोठया प्रमाणात निधी येत आहे. रत्नसिधू योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी आलेला आहे. हा निधीसुद्धा आमचा आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रत्नसिंधूचे अध्यक्ष आहेत. समिति सदस्य किरण उर्फ भय्या सामंत व माजी आमदार प्रमोद जठार आहेत सर्व माणसे आमची शिवसेना भाजप युतीची आहेत. ही सर्व विकासकामेआहेत 50 कोटीच्या विकासकामाबरोबरच विजेचीसुध्दा कामे मंजुर झाली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी फार मोठे योगदान आहे गावागावात विकासकामे होत असल्यामुळेच जिल्ह्यात शिवसेना संघटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. युतीच्या माध्यमातून विकासाची गंगा सिंधुदुर्गात सुरूच राहणार. मात्र त्यांचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये असे ठणकावून सांगितले. बंगे हे नेहमीच श्रेय घेण्यासाठी मग्न असतात आम्ही केलेल्या विकासकामाचे श्रेय त्यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यानी घेऊ नये असे सूचित केले.
मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच होते 5 वर्षे जिल्हा परिषद मतदार संघात काम करताना 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करून वाटचाल करत आहे त्यावेळी मी आमदार खासदार निधीसाठी पाठपुरावा केला होता. आता सुद्धा सत्तेत राहून तेच काम करत आहे 5 वर्षे जिल्हा परिषद सदस्य असताना मी शिवसेना सोडली नव्हती. इतर पक्षाची वेळोवेळी ऑफर असताना सुद्धा पक्ष सोडला नाही. जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा विकासकामाबाबत विश्वासात न घेणे सातत्याने तुम्ही केलेले आमचे खच्चीकरण यामुळे आम्ही शिवसेनेला रामराम केला असला तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच आहोत हे बंगे यांनी लक्षात ठेवावे माझ्या मतदार संघात 8 अंगणवाड्या शाळा दुरुस्ती कामे साकव कामे ही पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे व करीत आहे. काही जनतेची कामे ही प्रसंगी स्वतःच्या पैशातून केली आहे हे सुद्धा बंगे यांनी सर्वप्रथम माहिती करून घ्यावे नंतरच बिनबुडाचे आरोप करावेत.
आम्ही केलेल्या विकासकामांची परिपूर्ण माहिती आमच्याकडे आहेत. वाटल्यास ही माहिती बंगे यांना बघायची असेल ती सुध्दा बघण्यासाठी देऊ . सातशे रुपयाच्या ताडपत्रीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नये. पक्षांतर झाल्यानंतरही माझा पूर्ण लक्ष माझ्या मतदारसंघाकडे आहे.अपूर्ण राहिलेली कामे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.आत्ताच मा.दीपक भाईंनी दिलेल्या 50 लाख निधीतून गोवेरी, वाडीवरवडे, बिबवणे, घावनळे, बाव, नारूर्, पावशी, माड्याचीवाडी, पाट, पिंगुळी येथे ही कामे मंजूर झालेली आहेत. आंदुर्ले, माङयाचीवाडी येथे डोंगरी मधून घेतलेली कामं प्रस्तावित आहेत. शाळा दुरुस्ती, शाळा शौचालय दुरुस्ती मागणी प्रमाणे मी मंजूर करून दिलेली आहेत. तेंडोली 2, आंदुरले 2, गोवेरी 1, माङयाचीवाडी 1, पिंगुळी 1, या अंगणवाड्या मंजूर करून कित्येक पूर्ण ही झालेल्या आहेत.
बंगे साहेब तुम्ही 700 / ताडपत्री दिलीत आणि मी मे महिन्यात जेव्हा आदोसेवाडी मध्ये पूर्ण वाडीला पाणी मिळत नव्हतं तेव्हा स्वतःच्याच खर्चाने पाण्याचा पंप देवून महिलांची गैरसोय दूर केली. अशी कितीतरी कामं माझा मतदारसंघ माझी माणसं म्हणून केलेली आहेत. गोवेरी घाटकर घरासमोरच्या साकवासाठी , आवेरा शाळेसाठी सतत 3 वर्ष माझा पाठपुरावा सुरू होता. आणि हे सगळं तारीखवार पहायचं असेल तर आमच्या शाखेत कधीही या तिथे खातर जमा करूनच घ्या. प्रत्येक कामाची पोच आणि मंजूर झालेली कामं पाहायला मिळतील. असे वर्षा कुडाळकर यांनी पत्रकार म्हटले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.