म्हापसातील बेघर निराधार बांधवांच्या समस्या समजून घेण्यासाठी संदिप परब झोपले रात्रभर रस्त्यावर

ओरिसातील कृष्णा प्रधान या निराधार बांधवास संविता आश्रमात केले दाखल

म्हापसा :- जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांनी त्यांचे आजवरचे सारे जीवन रस्त्यावरील निराधार, बेघर, वंचिताना माणूसकीचे जीवन मिळण्यासाठी व्यतीत केलेय. भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे आता लवकरच पुर्ण होतील. मात्र अजूनही देशाच्या ग्रामीण भागासह विशेषतः मेट्रो शहरांत दारिद्र्याच्या कारणाने लक्षावधी लोकांना थंडी-उन-वादळ असो की तुफानी पाऊस त्यांना पदपथावरील वंचिततेचे जीवन जगावे लागते. या आपल्यासारख्याच हाडामासाच्या माणसांच्या रस्त्यावरील जीवनातील दुःख, अडचणी समजून घेवून त्यांचेशी संवाद साधण्यासाठी संदिप परब वारंवार रस्त्यावर झोपतात.

संदिप हे नुकतेच दि.११ जुलैच्या रात्री म्हापसातील रस्त्यावर झोपले असताना त्यांनी रस्त्यावरील अनेक बांधवांशी संवाद साधला. आणि यातूनच दुस-या दिवशीच्या सकाळी म्हापसा पोलिस आणि संस्थेतील सहकारी प्रसाद आंगणे सह कृष्णा प्रधान (वय वर्षे-५०) या ओरिसा राज्यातील बेघर निराधार बांधवाला कुडाळ पणदूर येथील संविता आश्रमात दाखल केले.

गोवा सह महाराष्ट्र राज्यातील मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आश्रम, शेल्टर होम व डे केअर सेंटर्स द्वारे रस्त्यावरील बांधवांच्या पुनर्वसनासाठी संदिप परब यांची जीवन आनंद संस्था कार्यरत आहे.

गोवा सह महाराष्ट्रातील संस्थेचे देणगीदार, हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे सेवा सुरू असल्याची भावना संदिप यांनी यावेळी व्यक्त केली.

किसन चौरे,कोकण नाऊ

error: Content is protected !!