पाट हायस्कूल मधील विविध कला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
प्रतिनिधी । कुडाळ : एस एल देसाई विद्यालय पाट मध्ये विविध कलाविषयक उपक्रम कै एकनाथजी ठाकूर कलाकादमी तर्फे राबविले जातात. यामधून कलाविषयक स्पर्धेमध्ये बरीच मुले सहभागी होतात. अशा यशस्वी मुलांचा सत्कार मंगळवारी विद्यालयात करण्यात आला.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेता कुमार ऋवेद कुसाजी कांबळी यांने प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्याचा सत्कार मुख्याध्यापक शामराव कोरे सर यांनी केला तसेच नृत्य स्पर्धेतील विजेते कुमारी युक्ती संतोष हळदणकर, कुमारी निधी गिरीधर केळुसकर, कुमारी दीक्षा श्रीकृष्ण सामंत यांचा सन्मान श्री केरकर सर श्री बोंदर सर यांनी केला. तसेच चित्रकला परीक्षेमध्ये अ श्रेणी प्राप्त विद्यार्थीको कु प्रज्योत मेस्त्री, कु भार्गवी पाटकर, कु सोहनी साळस्कर, कु योगिता मांजरेकर, कु संतोषी बिलीये, कुमार राज पाटकर, ऋग्वेद कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी संदिप साळसकर उपस्थित होते. सर्व संस्था कार्यकारणी सदस्य यांनीही सर्व यशस्वी मुलांचे कौतुक केले व जास्तीत जास्त मुलांना कलाविषयक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.