पिंगुळी मोडकावड येथे खड्ड्यामुळे कारचा अपघात

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा अपघात झाला. महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असून या खड्ड्यात कारचे चाक गेल्याने कार पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.





