अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असून, अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची दखल घेतली असून, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पंचनामे करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपण संपर्कात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी याकरिता मी प्रयत्नशील असणार असल्याचेही श्री राणे यांनी या पोस्टद्वारे म्हटले आहे.





