देवगड जामसंडे नगरपंचायत च्या प्रारूप विकास आराखड्याबाबत हरकती करीता मुदतवाढ द्या!

माजी आमदार राजन तेली यांची नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना प्राप्त होत आहेत. आराखड्‌याचा नकाशा सर्वसामान्य नागरिकांना समजण्यासाठी क्लिष्ट असून, त्यात नमूद सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक आणि गट क्रमांक स्पष्ट न नमूद झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा समावेश कोणत्या स्वरूपात झाला आहे हे समजण्यास अडचनी येत आहेत. त्यामुळे या हरकती घेण्याकरता मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी राज्याचे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये श्री. तेली यांनी म्हटले आहे, आराखड्याच्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी आणि हरकती सादर करण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या हरकतो वेळेत सादर करता आलेल्या नाहीत.
वरील सर्व बाबींचा विचार करता, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत स्थानिक नागरिकांना किमान ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी. या कालावधीत नगरपंचायत स्तरावर जनजागृती व समुपदेशन बैठका घेऊन नागरिकांकडून मिळालेल्या हरकती आणि सूचना एकत्रित करून नगररचना विभागास सादर केल्या जातील. असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.

error: Content is protected !!