कणकवली शहरातील 90 बचतगटांना “कृषी विज्ञान केंद्र किर्लोस” यांच्या वतीने मार्गदर्शन

बचतगटांनी कृषी विज्ञाना मार्फत छोटे-मोठे व्यवसाय कसे करावे या बद्दल करण्यात आले मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सुशांत नाईक यांनी या मार्गदर्शनाचे केले होते आयोजन

कणकवली शहरातील 90 बचतगतांना कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यावतीने कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती व विकास कसा करावा या विषयी शहरातील 90 बचतगटाच्या अध्यक्षा व महिला प्रतिनिधिंना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना काजरेकर सर, आनंद सावंत व बांबूलकर सर यांनी कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ कणकवली शहरातील बचतगतांना होईल असा विश्वास व्यक्त केला.
कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सुशांत नाईक यांच्यावतीने या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाईक यांनी पण मार्गदर्शन केले. या कृषी विज्ञान केंद्राच्या “स्मृती प्रोजेक्ट चा” जास्तीत जास्त लाभ शहरातील महिला बचतगटांना कसा होईल व त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल याचा लाभ शहरातील महिला बचतगटांनी घ्यावा व त्यांच्या मार्गदर्शन मिटिंग अटेंड करून अधिक लाभ कसा मिळेल या दृष्टीने मार्गदर्शन नाईक यांनी केले. यावेळी नीलम सावंत यांनी ही महिलांनी कस सक्षम व्हावे या बद्दल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै रोजी या सर्व बचतगटातील महिलांना म्हणजे जवळपास 800 महिलांना भेटवस्तू देण्याचे नियोजन करण्यात आले. उपस्थित बचतगटाच्या अध्यक्षांनी व प्रतिनिधिंनी ग्वाही दिली की 14 जुलै रोजी होणाऱ्या संदेश पारकर यांच्या वाढदिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेईल त्यावेळी बचतगटातील 800 महिला उपस्थित राहू. यावेळी गौरव हर्णे, साक्षी आमडोस्कर, दिव्या साळगावकर व शहरातील बचतगटांच्या अध्यक्षा व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!