कोण म्हणतं शिवसेना संपली?

सावंतवाडीवर भगवाच फडकेल;शैलेश परब यांनी व्यक्त केला दोडामार्गमध्ये विश्वास

सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच भगवा फडकणार आहे असा विश्वास सावंतवाडी विधानसभा प्रमुख शैलेश परब यांनी दोडामार्गमधील कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केला.
ते म्हणाले,जाणारे गेले,त्यांची फिकीर सोडा;पण जे आहेत त्यांच्या सोबत राहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करूया. आमची ताकद आजही आहे, येणाऱ्या काळात तुमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर सावंतवाडी मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवूया. त्यासाठी कामाला लागा अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते,जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका प्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, विनिता घाडी, संपदा देसाई श्रेयाली गवस, मदन राणे, मिलिंद नाईक, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, संतोष मोर्ये, संदेश राणे, शिवराम मोर्लेकर, दशरथ मोरजकर,सज्जन धाऊसकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

……आणि संभ्रम मिटला

शिवसेनेत फुट पडली.दोन भाग झाले.त्यामुळे या बैठकीला किती कार्यकर्ते येतील याबाबत संभ्रम होता; मात्र सभागृह कार्यकर्त्याच्या गर्दीने फुलले आणि संभ्रम मिटला.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत अजूनही कार्यकर्ते निष्ठेने उभे असल्याचे बैठकीने सिद्ध केले.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!