जानवली रिगल कॉलेजमध्ये चोरी प्रकरणी दोन्ही आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. राजेश परुळेकर, ॲड. भूषण बिसुरे, ॲड. सुबोध जाधव यांचा युक्तिवाद

जानवली रिगल कॉलेज येथे चोरी केल्या प्रकरणी दोन्ही आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली याप्रकरणी 19 ऑक्टोबर रोजी कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. राजेश परुळेकर व आरोपी क्र. २ तर्फे ॲड. भूषण बिसुरे व ॲड. सुबोध जाधव यांनी काम पाहिले. याबाबत पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार ५ लाख ४ हजार ६०१ एवढ्या रक्कमेच्या झालेल्या चोरी संदर्भात कणकवली पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), ३३१(३),३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी क्र. १. मानसी मनीष तेली हिला 21 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली तर आरोपी क्र. २. राजेश रजनीकांत तळेकर याला 23 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग दंडाधिकारी कणकवली यांनी आरोपींची प्रत्येकी 50 हजार च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. सदर कामी आरोपी क्र. १ तर्फे ॲड. राजेश परुळेकर व आरोपी क्र. २ तर्फे ॲड. भूषण बिसुरे व ॲड. सुबोध जाधव यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!