तेंडोली आवेरे शाळेला अतुल बंगे यांच्या कडुन या वर्षीही मोफत ताडपत्री प्रदान

सरपंच सौ अॅड अनघा तेंडोलकर यांनी शाळा दुरुस्तीची केली मागणी !
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली आवेरे जि प शाळेला गळती गेली दोन वर्षे असुन ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरती उपाययोजना करुन मुलांची गैरसोय दुर केली जाते यातच २०२२आणि २०२३ या दोन वर्षां पर्यंत शिवसेनेचे अतुल बंगे यांनी मोफत ताडपत्र्या देऊन विद्यार्थ्यांची काळजी घेतली आहे असे पालकांनी सांगुन या भागातुन निवडुन गेलेल्या जि प सदस्यांनी दुर्लक्ष केला आहे , असा आरोप केला आहे.
या शाळेची दुरुस्ती जि प ने तातडीने करावी अशी मागणी सरपंच सौ अनघा तेंडोलकर यांनी करुन येत्या चार ते पाच महीन्यात या शाळेच्या दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या कडे सरपंच सौ तेंडोलकर यांनी केली आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.