वालावल कवठी मार्गावर झाड पडून वाहतूक ठप्प

प्रतिनिधी । कुडाळ : वालावल कवठी मार्गावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भले मोठे झाड कोसळून मार्गावरच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत आणि चेंदवण हायस्कूलचे नाईक सर यांच्या मदतीने रस्त्यावरती कोसळलेली झाड मशीनच्या साह्याने तोडून रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आणि एक तासानंतर कुडाळ वालावल कवठी मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





