कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिज वरून कोसळणारे पाणी बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू

महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा
“स्काय लिफ्ट” मशनरी अभावी रखडले होते काम
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज वरून सर्व्हीस रस्त्यावर सुरू असणारे पाण्याचे धबधबे बंद करण्याच्या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरण कडून गेले काही दिवस उपाययोजना करण्यात येत होत्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे आवश्यक असणारी “स्काय लिफ्ट” मशिनरी आता उपलब्ध झाल्यानंतर फ्लाय ओव्हर ब्रिज वरून कोसळणारे धबधबे बंद करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली. फ्लाय ओव्हर ब्रिज वरील पाणी पाईप द्वारे ब्रिजच्या पिलर जवळ सोडण्यात येत होते. मात्र अनेक भागांमध्ये या पाईप द्वारे पाणी न जाता ज्या ठिकाणी पाईप फ्लाय ओव्हरला जॉईड केलेले होते तिथूनच भेट धबधब्या सुदृश्य पाणी सर्व्हीस रस्त्यावर कोसळत होते. याबाबत अनेकदा आवाज उठवुन देखील याकडे दुर्लक्ष केले जात होते. गेली तीन वर्ष हे काम मार्गी लावण्याबाबत सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर महामार्ग प्राधिकरण कडून केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम केले जात होते. मात्र याबाबत उपअभियंता श्री. साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी या कामाकरिता आवश्यक असणारी”स्काय लिफ्ट” मशिनरी उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले होते असे सांगितले. मात्र ही मशनरी दोन दिवसापूर्वीच उपलब्ध झाली असल्याने हे काम लवकर मार्गी लावले जाईल असे सांगण्यात आले. दरम्यान पावसाचा जोर असल्याने पाईप जॉईड करीता लावण्यात येणारे केमिकल हे पाईपला चिकटत नसल्याने पावसाने उघडीप घेतल्यानंतर हे काम वेगाने करणे सोपे जाणार असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आज गुरुवारी हे काम हाती घेण्यात आले. मात्र सातत्याच्या पावसाने या कामात अडथळे येत होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली