पाट हायस्कूलमध्ये कै. डॉ. विलासराव देसाई प्रथम स्मृतिदिन संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कुडाळ नगराध्यक्ष सौ. अक्षता खटावकर यांचा सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल.देसाई विद्यालय पाट व कै. एस. आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयात ५ जुलै 2023 रोजी संस्था अध्यक्ष कै.डॉ. विलासराव देसाई यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावी, बारावी व उच्च महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वेतोरे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका व प्रगतशील गणित शिक्षिका सौ .नीलिमा वालावलकर व प्रमुख अतिथी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व विद्यमान कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्रशालाचे मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी केले. संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. नलिनी वालावलकर व प्रमुख अतिथी सौ. अक्षता खटावकर मॅडम यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन विद्यालय व संस्थेमार्फत सत्कार केला. कै. डॉ. विलासराव देसाई यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
आई शिक्षक हे पहिले गुरु, सन्मानपूर्वक जगा. सुख, समाधान, आत्मविश्वास पेराल तर ते दुपटीने तुम्हाला परत मिळेल. चांगले व्यक्तिमत्व घेऊन जगणे ही तुमच्या आयुष्याची मिळकत आहे. संघटितपणे काम करा, वेळ पाळा असा अनमोल संदेश कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. नलिनी वालावलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. आज माझ्या शाळेने व माझ्या शिक्षकांनी माझा सत्कार करणे हा खास, अविस्मरणीय, आनंदाचा आणि भाग्याचा क्षण मला अनुभवता आला त्याबद्दल सर्व शिक्षकांचे व संस्थेचे मी आभार मानते असे मनोगत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. अक्षता खटावकर यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी संस्थेला पाच हजार रुपये देणगी संस्था कार्याध्यक्ष समाधान परब यांच्याकडे सुपूर्त केली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख अतिथी, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन संस्थेमार्फत गुणगौरव करण्यात आला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात चौथा १) नाईक आदित्य रमाकांत 494/500 98.80 २)तेजम समीक्षा राजेंद्र 482/500 96.40 ३) गोसावी पार्थ सतीश. /480/500 96.00 ४)मोडंकर सुहानी सुगंध 479/500 95.80 ५)जळवी अंकिता अरुण 477/500 95.40 ६) सरमळकर योगेश राधाकृष्ण 475/500 95 .00 ७) ठाकूर दत्तराज दीपक 466/500 93.20 ८)हाक्के मयुरी आनंदा 462/500 92.40 ९) गोसावी जीवन प्रशांत 462/500 92.40 १०)प्रभू पवन उमेश 461/500 92.20 ११)तेली सलोनी आत्माराम 460/500 92.00 १२) ज्ञानेश अविनाश रावले 459/500 १३) प्रभू योगिता नारायण 452/500 90.40
माध्यमिक विद्यालय नेरुर माड्याची वाडी प्रथम तीन क्रमांक१) केरकर प्रणय प्रकाश 470 94% २)गावडे मिताली मिलिंद 454 90.80, ३) परब नूतन रमेश 405 81.00
कै.सौ एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालय निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान विभाग —-१) माडये वृषाली शरद 496/ 600 82.66 २) गावडे खुशी रामचंद्र 439/600 73.16 ३) मुंडये लिनता विलास 429/ 600 71.50—- वाणिज्य विभाग १) नाईक नेहा प्रशांत 511/600 85.16 २) परब अभिषेक अरुण 505/600 84.16 ३)झोरे स्वप्नाली सहदेव494/600 82.73—‘ कला विभाग प्रथम रूचिता रवींद्र परब 384/600 पैकी 64.00% द्वितीय परब दत्तगुरू न्हानू 360/600 60.00 तृतीय कुंभार गौरी जनार्दन 338/600 56.33% कै. डॉ. विलासराव देसाई उच्च महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे एफ वाय बी ए १)वाघमोडे दिव्या संजय 321/600 53.50% २)एस वाय बी ए झाड महेश गजानन 357/800 ४४.६२ टक्के३) एफ वाय बी कॉम केळुस्कर भूषण अनिल 517/700 73.85% ४)एस वाय बी कॉम घाडी वृषाली 435/700 62.42%
मे 2023 मध्ये डॉट कॉम असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय ज्ञानी मी होणारच या स्पर्धेत कुमार सुयश सद्गुरु साटेलकर जिल्ह्यात प्रथम क्रमांक तसेच जिव्हाळा उद्योग समूह अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय गणित बेसिक स्पर्धेत राज्यात पहिल्या पाच स्पर्धकात निवड . त्याचप्रमाणे कुमारी सोहनी संदीप साळसकर गणित प्रज्ञा परीक्षेत सिल्वर कॅटेगरी प्राप्त विद्यार्थिनी. या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व मान्यवरांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला . माध्यमिक विभाग कुमार रामदास मोर्ये, उच्च माध्यमिक विभाग भक्ति गावडे ,उच्च महाविद्यालयातील कुमारी अदिती सामंत या सर्व विद्यार्थ्यांनी कै.डॉ. विलासराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी भाषणे केली .संस्थेचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान ,नेतृत्व ,दातृत्व व कर्तृत्व या तीनही गुणांचा सुंदर मिलाफ असणारे, राजस, मनमिळाऊ ,शांत व्यक्तिमत्व. निराधार ,गरजू ,कर्णबधिर, मूकबधिर मुलांची सेवा करणारे, सांस्कृतिक व सामाजिक योगदान देणारे, अतुलनीय कामगिरी करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा शब्दात प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. दीपिका सामंत यांनी आपल्या अमोघ शैलीत कै.डॉ.विलासराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. संस्थेची उल्लेखनीय प्रगती कै.डॉ. विलासराव देसाई यांच्याच काळात झाली असे गौरवपूर्ण उद्गार संस्था उपाध्यक्ष माननीय श्री. दिगंबर सामंत यांनी काढले .देसाई कुटुंबीयांनी ज्ञानदानाची मुहूर्तमेढ रोवली असे ते आपल्या भाषणात म्हणाले .शाळेला विसरू नका, स्पर्धा परीक्षेत यश मिळवा, उत्तम प्रशासक व्हा अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल संदेश दिला.
म्हापण गावचे सुपुत्र अजित रावले यांनी संस्थेला देणगी स्वरूपात दहा हजार रुपयांच्या छत्र्या भेट म्हणून विद्यार्थ्यांना दिल्या. त्यांचेही वाटप प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांपैकी कुमारी सुहानी मोंडकर व सलोनी तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पालकांच्या वतीने कुमार आदित्य रमाकांत नाईक याचे वडील श्री .रमाकांत नाईक यांनी एकाग्रता, आत्मविश्वास यांच्या बळावर आदित्यने परीक्षेत यश मिळवले व संस्था पदाधिकारी, शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करून सर्वांनी नियमित अभ्यास करा व यश मिळवा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष समाधान परब, उपाध्यक्ष दिगंबर सामंत, खजिनदार देवदत्त साळगांवकर, सुभाष चौधरी, दीपक पाटकर, श्री. तळावडेकर, राजेश सामंत, प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. जानह्वी पडते व आभार प्रदर्शन प्रशालेचे पर्यवेक्षक राजन हंजनकर यांनी केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!