मुकी बिचारी । विजेची तार पडून मृत्यू

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यात नेरूर वालावल रस्त्यावर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल समोर मध्यरात्री विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. त्याचा स्पर्श झाल्याने दोन कुत्र्यांचा जीव गेला आहे. मध्यरात्री लागलीच नेरूरचे वायरमन वैभव ठाकूर यांनी लाईन बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर वैभव ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्युत तारा जोडत सकाळी लाईट पूर्ववत केली. पण विद्युतभारित तारांचा स्पर्श झाल्यानं दोन मुक्या जीवांच्या प्राणावर बेतलं.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!