आनंद पाताडे यांचे निधन

आज सायंकाळी ५ वाजता कासार्डे येथे होणार अंत्यसंस्कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रमुख म्हणून जबाबदारी वाहिलेले मूळ कासारडे येथील असलेले आनंद पाताडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता कासार्डे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
काल सकाळी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने कणकवली येथील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.
सतत हसमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. आनंद जिवाजी पाताडे यांच्या पश्चात आई, दोन मुलगे, सून नात व एक मुलगी. असा परिवार आहे.
पाताडे कुटुंबियांसाठीचा संपर्क क्रमांक ९५६१४७५४४४ असा आहे.
कणकवली ब्युरो न्यूज