कणकवली भाजपा आयोजित दिवाळी बाजारातील आर्थिक उलाढाल जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण!

पालकमंत्री नितेश राणे यांचे उद्गार
कणकवली भाजपा आयोजित दिवाळी बाजाराचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
दिवाळी फराळ, दिवाळीसाठीचे साहित्य व अन्य अनेक वस्तू एकाच जागेवर
कोकणात दुष्काळाचा पहिला टिगर जाहीर झालेला असताना या भाजपा आयोजित दिवाळी बाजाराला एक वेगळे महत्त्व आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या स्थानिक व्यावसायिकांना बळ देण्याचा काम आपण ग्राहक म्हणून सर्वांनी केलं पाहिजे. या दिवाळी बाजारामध्ये होणारा प्रत्येक खरेदी विक्रीचा व्यवहार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाचा ठरणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बाजार सुरू केला व गेले आठ वर्षे सातत्याने सुरू ठेवला ही देखील फार महत्त्वाची बाब आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कणकवली शहर भाजपा आयोजित दिवाळी बाजाराच्या शुभारंभ श्री राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या दिवाळी बाजारामध्ये 40 दिवाळीसाठी चे स्टॉल तर कुंभार समाजाने घडवलेल्या मातीच्या भांड्याचे 10 स्टॉल लावण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी या दिवाळी बाजाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी देखील मार्गदर्शन केले. या प्रसंगी, सभापती हर्षदा वाळके, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, नगरसेविका सुप्रिया नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, सुप्रिया मेस्त्री, नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, प्रतीक्षा सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, विठ्ठल देसाई, सुशील पारकर, गौतम खुडकर, समीर प्रभूगावकर, अभय राणे, औदुंबर राणे, राजन परब, सागर राणे, बंडू गांगण, मिथुन ठाणेकर, सुप्रिया पाटील, पंकज पेडणेकर , महेश सावंत आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली






