कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केटच्या संपादना करिता 19 लाखांच्या निधीला मंजुरी

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती
पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे नगराध्यक्ष यांनी मानले आभार
कणकवली शहरातील भाजी मार्केटच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. कणकवली नगरपंचायत हद्दीतील आरक्षण क्रमांक ५ मधील प्रस्तावित भाजी मार्केटसाठी आवश्यक जागा संपादित करण्याकरिता जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत तब्बल १९ लाख ४३१ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या भाजी मार्केटच्या जागा संपादन प्रक्रियेला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे शहराच्या वतीने आभार मानले आहेत.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कणकवली शहरातील भाजी विक्रेते आणि नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबत प्रशासकीय मान्यता आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत हद्दीतील आरक्षण क्रमांक ५ मधील भाजी मार्केटसाठी आवश्यक जागा संपादित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधित जागा सर्व्हे क्रमांक १८८/ब मध्ये असून, या सर्व्हेतील एकूण ०.०८.०० हेक्टर क्षेत्रापैकी ०.०३.१५ हेक्टर क्षेत्र भाजी मार्केट विकसित करण्यासाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या जागेच्या संपादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी एकूण १९ लाख ४३१ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा हिस्सा १७ लाख १० हजार रुपये, तर स्थानिक स्वराज्य या प्रकल्पासाठी एकूण १९ लाख ४३१ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा हिस्सा १७ लाख १० हजार रुपये, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा १ लाख ९० हजार ४३१ रुपये असा आहे.
या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेच्या माध्यमातून मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी नियमानुसार जागा संपादन, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक आणि इतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.
कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लागणे महत्त्वाचे मानले जात आहे. या कामाला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे विशेष आभार मानले आहेत. शहरातील भाजी विक्रेत्यांना सुसज्ज आणि नियोजनबद्ध जागा उपलब्ध व्हावी, तसेच नागरिकांनाही भाजी खरेदीसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने भाजी मार्केटचा विकास महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे विशेष आभार मानले आहेत. शहरातील भाजी विक्रेत्यांना सुसज्ज आणि नियोजनबद्ध जागा उपलब्ध व्हावी, तसेच नागरिकांनाही भाजी खरेदीसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने भाजी मार्केटचा विकास महत्त्वाचा ठरणार आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेता नियोजनबद्ध भाजी मार्केट उभारणे ही काळाची गरज बनली आहे. नव्या भाजी मार्केटमुळे भाजी विक्रेत्यांची जागेची समस्या कमी होण्यास मदत होईल, तसेच ग्राहकांनाही स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त बाजारपेठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
१९ लाख ४३१ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या प्रकल्पातील जागा संपादनाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आता उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष भाजी मार्केटच्या विकासकामाला कधी सुरुवात होते, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागले आहे.






