झाराप येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुपौर्णिमेनिमित्त झाराप येथे जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या सभागृहात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी सरपंच स्वाती तेंडोलकर,आश्पाक कुडाळकर , मुख्याध्यापक अमिता सामंत, सुबोध शिरोडकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे बाळकृष्ण मांजरेकर, नारायण मेस्त्री, शिल्पा माणगावकर,साक्षी तेली,आनंद माणगावकर, दिव्या गावकर,अजलीन फर्नांडिस ,शिवराम हरमलकर, वैदेही काळसेकर, मंगेश गावकर ,स्नेहा सावंत सोहम साळसकर शेजल माणगांवकर , विष्णु माण गांवकर, सोयल जद्दी, अनिल गोडे, नाथा काळसेकर, मुंडये, संतोष वारंग,मनीष बोभटे,अनिकेत तेंडोलकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्येक्रमात विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले तर सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या स्वाती तेंडोलकर यांच्या सौजन्याने व संतोष वारंग यांच्या सौजन्याने वृक्ष वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पड़ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेना झाराप शाखेच्या माध्यमातून गेली २ वर्ष हा कार्यक्रम केला जातो, त्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
साळगाव हायस्कूलचे मुख्यध्यपाक सलीम तकिलदार यांनी मार्गदर्शन करताना ‘सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वत:शीच स्पर्धा करायला हवी. आमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला आहे का, याचेही आत्मपरीक्षण करायला हवे. असे सांगितले. बबन बोभटे म्हणाले”आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून राष्ट्रीय संपत्ती आहे, आधुनिक, प्रगतशील व मजबूत राष्ट्र उभारणीसाठी यांचे मोलाचे योगदान लाभणार आहे, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांवर आपले मत न लादता त्यांना ज्या क्षेत्राची आवड आहे. त्या क्षेत्रात त्यांच्या इच्छेप्रमाणे वाटचाल करून सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी प्रोत्साहन द्या वैद्यकीय व इंजिनियर शिवाय इतर अशी अनेक क्षेत्र आहेत त्यातही खूप वाव असून बरेच काही करण्यासारखे आहे सूत्र संचालन सुबोध शिरोडकर यांनी तर प्रस्ताविक माजी सरपंच स्वाती तेडोलकर यांनी केले आभार आश्पाक कुडाळकर यांनी मानले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!