नेरुरमध्ये उद्या ‘अजमेध यज्ञ’ संयुक्त दशावतार

प्रतिनिधी । कुडाळ : नेरूर मित्र मंडळ नेरूर यांच्या वतीने उद्या बुधवार दिनांक ५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुखकर्ता हॉल नेरूर चव्हाटा येथे ‘अजमेध यज्ञ’ हा महान पौराणिक नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
या नाट्यप्रयोगाची कथा संकल्पना पप्पू नांदोस्कर यांची आहे. या नाट्यप्रयोगामध्ये गणपती – प्रतीक कलिंगण, रिधी सिधी – बंड्या पवार, इंद्र – महेंद्र कुडव, केशी – सुहास मालकर, विष्णु – नारायण आशयेकर , ब्रह्मदेव – यशवंत तेंडुलकर, शंकर – प्रशांत मयेकर , नारद – दत्तप्रसाद शेणई, भुगु ऋषी – अनिल घावनलकर, स्कंध – गौरव शिर्के, यज्ञपक्षु – मोरेश्वर सावंत, देवसेना – सुधीर तांडेल यांच्या भूमिका आहेत. तसेच संगीत साथ : हार्मोनियम – आशिष तवटे , पखवाज – मंदार सावंत, तालरक्षक – राजू कलिंगण. विशेष सहाय्य : लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूरयांचे आहे.
या संयुक्त दशावतारास सर्व नाट्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन, नेरूर मित्र मंडळ नेरूर यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!