सिंधुरत्न योजनेमधून पाट गावात विद्युत ट्रान्सफॉर्मरसाठी १० लाख रु मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

शिवसेनेचे जेष्ठ नेते अतुल बंगे आणि उपविभाग प्रमुख महेश वेळकर यांची होती मागणी

प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुरत्न योजनेमध्ये आमदार वैभव नाईक यांनी शिफारस करून कुडाळ तालुक्यातील पाट गावातील मारुती मंदिर गोसावीवाडी येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी १० लाख रु मंजूर करून घेतले आहेत. लवकरच हे काम पूर्णत्वास नेले जाणार असून येथील विद्युत समस्या मार्गी लागणार आहे.


पाट गावात कमी विद्युत दाबाची समस्या होती. त्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते अतुल बंगे, उपविभाग प्रमुख महेश वेळकर व स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे विद्युत ट्रान्सफॉर्मरसाठी पाठपुरावा केला होता.ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन सिंधुरत्न योजेनेमध्ये आ.वैभव नाईक यांनी या कामाची शिफारस करून ट्रान्सफॉर्मरसाठी १० लाख रु मंजूर करून घेतले. त्याबद्दल अतुल बंगे, महेश वेळकर व ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!