गुरूच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण घ्या – नंदकिशोर काळे

प्रतिनिधी । कुडाळ : आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येकाने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले पिंगुळी गिअर अप येथे आतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला
   पिंगुळी येथील गिअर अप जीम चे संचालक साईराज जाधव व हेमंत जाधव यांच्या सौजन्याने आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून  योग मार्गदर्शन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे यांच्या हस्ते झाले यावेळी साईराज जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य दिव्या गावडे पंकज गावडे विनायक पिंगुळकर अँड तेजाली भणगे अँड हितेश कुडाळकर सचिन चव्हाण सूजित कामत आदित्य सावंत तन्वी सावंत सुवर्णा गावडे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री काळे  म्हणाले आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने सजग राहीले पाहिजे केवळ हा योग दिन एक दिवस साजरा न करता सातत्य महत्वाचें आहे आज योगा प्रात्यक्षिकाची अत्यंत गरज आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यात योग हा महत्त्वाचा ठरलेला आहे  योगामुळे आपले शरीर आपली तब्येत यामध्ये आमुलाग्र बदल होऊन भविष्यात अनेक आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो असे सांगितले प्रास्ताविकात गिअर अप चे संचालक साईराज जाधव यांनी दैनंदिन जीवनात योग किती महत्वाचा आहे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले भविष्यात योग चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार असल्याचे सागून फिटनेसबाबत मार्गदर्शन केले

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!