प्रेरणादायी ! ग्रंथालयाला पुस्तके देऊन वाढदिवस साजरा

विनायक पाटील यांची आदर्शवत कामगिरी
प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील क्षा. म. समाज मुंबई संचलित के एम एस अद्यापक विद्यालय मिठबाव येथील डीएड कॉलेजचा विद्यार्थी विनायक पाटील यांने आपला वाढदिवस कॉलेजच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला ही निश्चितच आजच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देणारी बाब आहे असे प्राचार्य भालचंद्र चव्हाण यानी सागितले
प्रत्येकजण आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात विनायक पाटील या विद्यार्थ्यांने आपला वाढदिवस केक कापून साजरा न करता ज्या अद्यापक विद्यालय मिठबाव येथून शिक्षण घेतले त्या विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट देऊन एक चागला आदर्श सर्वासमोर ठेवला केक इतर बढेजाव खर्च करण्या पेक्षा वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट दिली याबद्दल कॉलेजचे प्राचार्य भालचंद्र चव्हाण यांनी विनायकचे कौतुक केले यावेळी प्रा. माधुरी तांबे, दिपाली आचरेकर, राजेश शिरगावकर, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, मांजरेकर, विद्यार्थी सई मराठे,सायली वळंजू, ओमकार दळवी, प्रतीक्षा बढे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.