केळूस येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती

प्रतिनिधी । कुडाळ : केळूस येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली जि प प्राथमिक शाळा नवभारत विद्यालय केळूस नं.१ शाळेचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
जि प प्राथमिक शाळा नवभारत विद्यालय केळूस नं.१ शाळेचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई माऊली ढोलपथक. चेंदवणच्या साथीने वेशभूषेतील विदयार्थ्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी. संतोष गोसावी, राज्यशिक्षक पुरस्कार प्राप्त उदय गोसावी, ‘उपनिरीक्षक निवती पोलिस स्टेशन श्री. कांबळे, श्री कदम या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी दिलीप केळूसकर, केळुस सरपंच योगेश शेट्ये , प्रकाश खोत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुप्रिया मयेकर, मनोहर पावसकर, श्री. आरावकर अंगणवडी सेविका संगीता केळुस्कर अंजली केळुस्कर मदतनीस नागेश आरोलकर, सचिन मुनणकर, दत्तू राऊळ, सर्वेश तांडेल, प्रज्योत केळुस्कर, रोहन प्रभू, रुपेश मुनणकर, आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर, आजी-माजी विद्यार्थी शिक्षक यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित केलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत प्रथम मृणाल सावंत, द्वितीय समर्थ गवंडी, तृतीय स्वरांगी खानोलकर यांनी मिळविला उतेजनार्थ नेहा जाधव, पुर्वा मेस्त्री, शंकर गवस यांनी मिळविला. बेस्ट एक्स्प्रेशन- दुर्वा पावसकर, बेस्ट कॉस्च्युम निधी खडपकर, बेस्ट थीम – प्रेयश पवार यांना गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण कविता राऊळ आणि भक्ती जामसंडेकर यांनी केले.
सकाळच्या सत्रात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बऱ्याच रक्तदात्यांनी रक्तदान केले. महीलांसाठी खास आकर्षण असलेला होम मिनीस्टर अर्थात खेळ पैठणीचा तसेच फनी गेम्स, शालेय व विद्यार्थ्यांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम देखील करण्यात आले कार्यक्रमाची सांगता दशावतार नाट्यप्रयोगाने करण्यात आली
अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रम समारोप प्रसंगी माजी जि प अध्यक्ष राजन तेली, माजी सभापती निलेश सामंत, उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश तांबे यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.