सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

कोलगांव- चव्हाणवाडी ते पत्रकार सागर चव्हाण यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा खडीकरण व डांबरीकरण भुमिपूजन सोहळा आज (मंगळवारी) भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते पार पडला.
स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार २५-१५ योजनेतून या रस्त्याच्या खडीकरण- डांबरीकरणसाठी निधी मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी १५ वर्ष जमीनीच्या वादात अडकलेला प्रश्न निकाली काढत दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल कोलगाव सोसायटीचे संचालक बाबूराव चव्हाण यांचा महेश सारंग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्गुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी सरपंच राजन कुडतरकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता विजय चव्हाण, माजी सरपंच राजन कुडतरकर, भाजप बुध अध्यक्ष सुरेश दळवी, जयानंद म्हापसेकर आदींच पत्रकार सागर चव्हाण यांनी स्वागत केलं. सरपंच संतोष राऊळ आणि बाबूराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केल.
भाजप नेते महेश सारंग यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून कोलगांव गावाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रोज एका विकासकामाचा गावात शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे जनतेत राहून जनतेसाठी काम करणाऱ्या भाजपसोबत राहावं. येणाऱ्या लोकसभेत भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी पाठीशी रहाव असं आवाहन करत नव्या रस्त्याच्या भुमिपूजन प्रसंगी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मधुकर चव्हाण, बबन कोलगावकर, गोपाळ उर्फ दाजी चव्हाण, दीपक चव्हाण, कृष्णा चव्हाण, राजकुमार चव्हाण, रवी चव्हाण, अँड. परशुराम चव्हाण, आनंद चव्हाण, भरत चव्हाण बबिता चव्हाण, तारामती चव्हाण, नर्मदा चव्हाण, विजया चव्हाण, रेषा चव्हाण, गौरी चव्हाण, संध्या चव्हाण, गौरी चव्हाण – कुटे, संदेश चिकोटिकर, संजोग जाधव, राजेश पाटील, शंकर गोंडयाळकर, परशुराम गोंडयाळकर, शिक्षक गुरुप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : प्रतिनिधि