कुडाळ पं.स. मध्ये उद्या प्रशासकीय संस्कार शिबीर

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच   सर्वसामान्यपासून सर्वच घटकातील लोकांची कामे  त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे सकारात्मक पध्दतीने सुटले पाहिजे  या अनुषंगाने शिपाई, ड्रायव्हर ते सर्व विभागातील अधिकाऱ्यांसाठी उद्या बुधवार २४ मे रोजी सकाळी दहा वाजता प्रशासकीय संस्कार शिबिराचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले आहे  अशी माहिती प्रशासक तथा  गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली
   यावेळी बोलताना गट विकास अधिकारी चव्हाण म्हणाले, आज आपल्याकडे शिपाई  ड्रायव्हर सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व घटकापासून सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे सकारात्मक  दृष्टिकोनातून सुटावे या अनुषंगाने  आगळ्यावेगळ्या प्रशासकीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या सर्वसामान्यांना योग्य तऱ्हेने न्याय मिळावा, त्याच्यावर अन्याय होऊ नये हा या मागचा उद्देश आहे.
या संस्कार शिबिरामध्ये टिप्पणी लेखन सर्व प्रकारचे कार्यालयीन पत्रव्यवहार  अधिकारी कर्मचारी समन्वयक कार्यालयीन शिस्त व शिष्टाचार पर्यवेक्षकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य  रिसीट केस कामकाज, माहितीचा अधिकार, अधिनियम, मुद्दे पूर्तता, कामाबाबत कामकाज, परीक्षण, खाते प्रमुख तपासणी, लेखाविषयक सर्व कामकाज, खरेदी प्रक्रिया, कॅशबुक, पेटीकॅशबुक, जमा खर्च, रजिस्टर, सर्व प्रकारची देयके तयार करणे, आरोग्याची काळजी, तसेच योगा, व्यायामाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सर्व कर्मचारी यांची समाजाप्रती असलेली कर्तव्य व लोकप्रतिनिधी यांच्याशी असलेले समन्वय आदी विविध विषयांवर  प्रशासकीय संस्कार शिबिर होणार आहे.   गुंतवणुकीबाबत  मार्गदर्शन तसेच ऑनलाईन फसवणूकीबाबत  संस्कार शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील  तज्ञ मार्गदर्शक या शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्री चव्हाण यांनी दिली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!