लाच मागल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वनमजुर नारायण शिर्केला जामीन मंजूर

संशयिताच्या वतीने ऍड विरेश नाईक यांचा युक्तिवाद
कणकवली वनविभागातील वनमजुर नारायण शिर्के याने लाकूड वाहतुकी संदर्भातील कामाकरिता तब्बल 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची सशर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. वीरेश नाईक यांनी काम पाहिले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली जानवली येथील वनविभागातील नारायण शिर्के याला लाच मागताना रंगेहाथ पकडले. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयिताला पोलीस कोठडी संपल्या नंतर न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





