साईदरबार येथे २२ रोजी श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

निलेश जोशी । कुडाळ : येथील कविलगाव – साई दरबार येथे असलेल्या भारतातील पहिल्या साई मंदिरातील श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी होत आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आले आहे.
शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पूजा आणि अभिषेक, ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११ वाजता अखंड नामस्मरण, दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, दुपारी १२.३० पासून महाप्रसाद, दुपारी २ वाजता भजने, सायंकाळी ६ वाजता विशेष पालखी सोहळा, रात्रौ ८.१५ वाजता महाआरती. आणि रात्री ९.१५ वाजता साई कलामंच कुडाळ निर्मित दोन अंकी नाटक बत्ताशी १९७४ सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा साई भक्तांनी लाभ घ्या असे आवाहन श्री साई दरबार उत्सव समिती, कुडाळ यांनी केले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!